अवकाळी पावसामुळे देवळा तालुक्यात हाहाकार; अनेक जनावरे दगावली; शेतकऱ्यांचा मेंढपाळांची अतोनात नुकसान

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ, मो.9130040024 )कालपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती मालाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी पुर्णता मेटाकुटीला आलेला आहे.या पावसामुळे काढणीस आलेल्या लाल कांदा खराब होण्याची शक्यता आहे.तसेच उन्हाळ कांद्याचे रोप सुध्दा खराब होण्याची शक्यता आहे.तसेच कालपासून चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे देवळा तालुक्यातील दहिवड येथील शिदेंवाडी भंवरी मळा येथील मेंढपाळ श्री.कौतिक प्रभाकर शिंदे यांच्या 4 मेंढ्या,2 कोकरु,1बकरी,2बकरीचे पिल्ले,1गायीचे वासरू हे रात्रभर चाललेल्या पावसात गाठल्याने मुत्यु मुखी पडल्या आहेत.या प्रकरणी प्रशासनाने त्वरीत पंचनामा करावा व नुकसानग्रस्त मेंढपाळाला नुकसान भरपाई मिळावी यांची मागणी देवळा तालुका प्रहार अध्यक्ष श्री. संजय दहिवडकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here