मावळतीला सायंकाळी तांबडे आभाळ दिसल्यास ७२तासात पाउस येतो – पंजाबराव डक

0

अहमदनगर : जर सुर्यास्ताच्या वेळी मावळतीला तांबडे आभाळ दिसल्यास ७२ तासात पाउस येणार  पंजाबराव डक जर सुर्यास्ताच्या वेळेस मावळतीला तांबडे आकाश दिसल्यास बहात्तर तासात निश्चित पाउस येतो असा संदेश परभणी जिल्ह्यातील सेलू परिसरातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी दिला. ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथिल सनग्लोरी आँर्गेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या क्रुषीमित्र गुळ उद्योग कारखान्याच्या गळित हंगामाच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ नागरी पतसंस्थेचे चेरमन अर्जुनराव दादाबा राजळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रसिद्ध कायदेतज्ञ अँडव्होकेट अतुल क्रुष्णकांत दिक्षित, व सौ.अनिता अतुल दिक्षित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य भाउसाहेब राजळे, आणि हनुमान टाकळीच्या समर्थ हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश अप्पा महाराज हे होते. प्रथम नारळ फोडून विधीवत पुजा करून गव्हाणीत उसाची मोळी टाकून गुळ उद्योग गळित हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.प्रास्ताविक क्रुषिमित्र संदिप राजळे यांनी केले. यावेळी सर्व मांन्यवरांची भाषणे झाली.प्रमुख संदेश देताना पंजाबराव डक पुढे म्हणाले की विजेच्या दीव्याभोवती पाकोळ्या,किडे जमा होणे,उष्णतेमुळे रस्त्यावर साप दिसने,चिमण्या धुळीतील मातीने अंघोळ करणे,आकाशात विमान नसतानाही विमान गेल्याचा आवाज ऐकू येणे ही लक्षणे दिसल्यास पुढील बहात्तर तासात पाउस येईल असे समजावे. कावळ्याने घरटे झाडाच्या उंच शेंड्यावर बांधल्यास पाउस कमी होतो आणि झाडाच्या मध्यावर बांधल्यास पाउस जास्त होतो अशी अनेक उदाहरणे देत उपस्थित शेतकऱ्यांना मंत्रमुग्ध करीत मार्गदर्शन केले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे,माजी मुख्याध्यापक डी.व्ही.म्हस्केसर, संभानाना राजळे,भाउपाटील राजळे,मुरलीधर भगत, निव्रुत्त पोलिस निरीक्षक मुक्ताजी भगत,हौसराव राजळे,ज्ञानदेव जगताप, महादेव शेळके, वैभव आंधळे,उद्धव ताठे,अलका ,विजय राजळे,म्हातारदेव राजळे,विवेक राजळे,क्रुष्णा राजळे, म्हातारदेव शेळके हे उपस्थित होते. सुत्रसंचालन गोरक्षनाथ राजळेसर यांनी तर आभार सौ.शोभा राजळे यांनी मानले. ( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here