कै.सुविद्या दत्तात्रय तळेकर यांच्या नावाने आणि विजय पाध्ये यांच्या हस्ते व् उपस्थितीत संपन्न होणार अभियान सन्मान सोहळा.

0

मुंबई : स्वातंत्रसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या कला केंद्राच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कलाश्रमच्या वतीने अभियान सन्मान आणि अव्वल पुरस्काराचे आयोजन ३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी संध्याकाळी ७.०० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला बि. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे संचालक विजय पाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेते, कथाकार, स्तंभलेखक भालचंद्र घाडीगावकर आणि पत्रकार, नाट्य समिक्षक, लेखक रमेश उदारे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुरस्कार आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांना अव्वल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने नोव्हेंबर महिन्यांतील स्मृतिदिन लक्षात घेऊन गायिका माणिक वर्मा यांना संगितमय आदरांजली वाहिली जाणार आहे. यात मृण्मयी पुंडे , ऋजुता पुंडे या भगिनिंचा सहभाग आहे. निवेदन तपस्वी राणे, आदर्श शिक्षिका सुविद्या तळेकर या दिवंगतांच्या नावाचे दखलपत्र निवेदक मंदार खराडे आणि आदर्श शिक्षिका गीता शेलार यांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी खरडे तर दखलपत्रचे वाचन प्रसाद पवार, प्रितिका वरणकर, अभिजित धोत्रे हे कलाश्रमचे सदस्य करणार आहेत. कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून केले जाणार आहे. अशी माहिती कलाश्रमच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी दिली.अभियान सन्मानचे हे चाळीसावे पुष्प आहे.( गणेश तळेकर. (निर्माता-पत्रकार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here