आमठाणा येथे होणार पंजाब डख यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळावा

0

आमठाणा: (  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) प्रतिनिधि,पाऊस पाणीसह हवामानाचा अंदाज अचूक व तेहि मोफत कळवून शेतकऱ्यासह सर्वांच्या गळ्यातले ताईत बनुन महाराष्ट्रभर ज्यांचे नाव सध्या गाजत आहेत असे शेतकरी मित्र पंजाब डख यांचा सील्लोड तालुक्यात प्रथमच भव्य नागरी सत्कार व शेतीविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजन दिनांक 30 नोव्हेंबर 2021 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता आमठाणा येथील बाजार पेठेत माजी सभापति अशोक गरुड़ व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला आहेत. पंजाब डख ओळख =- सलग पंधरा ते विस वर्ष महाराष्ट्रभराच्या विविध भागात जाऊन,अथक परिश्रम करीत अवतिभोवती परिसरात काय बदल झाल्याने त्याचा पावसावर काय परिणाम होतो याचे अंदाज बांधुन हवामान बाबत मोजका व नेमका अंदाज देत शेतकरी वर्गासह सर्वच बाबित हवामान विषयी श्री. डख यांच्याकडून सहकार्य झाले.मेहनत व साधे पनाच्या जोरावर पाऊस पान्याच्या बाबतीत माहिती देनारे जादूगार, भविष्यकार म्हणुन ज्यांच्याकडे पाहिले जानारे शेतकरी पुत्र असून ते जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक आहेत.लाखों लोक त्यांच्या हवामान संदेशाची प्रतीक्षा करीत असतात. अलिकडील कालावधित अनेक ठिकाणी जाऊन हवामान अंदाज व पिक व्यवस्थापन बाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमात पंजाब डख हजर असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here