संविधान गौरव दिन

0

मनमाड : ऑल इंडिया एस.सी./एस.टी. रेल्वे एम्प्लाइज असोसिएशन (का/शा) मनमाड़ तर्फे दि. 26/11/2021 शुक्रवार रोजी संविधान दिना निमित्त ‘संविधान गौरव दिन ‘ साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त सकाळी 8.00 वाजता मनमाड रेल्वे वर्कशॉप मध्ये टाइम बूथ समोर संविधानाच्या प्रास्तविकाचे वाचन करण्यात आले.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कारखाना प्रबंधक पापाचंद साहेब, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे आदी उपस्थित होते.यावेळी संतोष शिलावट यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन केले.तसेच वेल्डिंग विभागातील महिला कर्मचारी पुजा सुपेकर सुवर्णा डोलणार व G.M.पुरस्कार मिळालेले कर्मचारी मनिष साळवे यांच्या सत्कार सहाय्यक कारखाना प्रबंधक पापाचंद साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.कामगारांमध्ये भारतीय संविधान चे जणजागृती व्हावी यासाठी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे कारखाना मधील टाईम बुथ जवळ भारतीय संविधान च्या उद्दशिकाचे बॅनर लावण्यात आले आहे त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिन इंगळे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्र पगारे, संजय केदारे, फकिरा सोनवणे, किरण आहीरे, कल्याण धिवर, प्रशांत मोरे, पंढरीनाथ पठारे, किरण वाघ, प्रदीप अहिरे, राहुल शिंदे,प्रेमदिप खडताळे, विनोद झोडपे,राजू इस्मपलि, वरूण म्हसदे, अभ्युदय बागुल, अनिल अहिरे, राजेंद्र सोनवणे,राजेश जगताप, निखिल सोनवणे,,स़तोष सांवत,धम्माल पखाले आदी ने केले.यावेळी कामगार बंधू आणि भागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी असोसिएशन वतीने सर्व कामगारांना मोफत चहा वाटप करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here