
नांदगाव : नांदगाव पंचायत समिती समोर आज गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00वाजता आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर गटप्रवर्तक यांचे मुक्कामी आंदोलन सुरू केले.हे आंदोलन भर उन्हामध्ये दुपारी 2.00 वाजे पर्यंत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन गट विकास अधिकारी चौधरी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष जगताप यांनी आंदोलन स्थळी येऊन प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतचे पत्र ग्रामसेवक यांना देण्यात आल्याचे सांगितले. 15 डिसेंबर 2021 पर्यंत जून 2021 ते नोव्हेंबर 2021 चे पैसे देण्यात येतील तसेच मे 2020 ते मे 2021 पर्यंत चे पैसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मागून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा संघटक कॉम्रेड विजय दराडे यांनी केले आंदोलनात दिपाली कदम चित्रा तांबोळी, शारदा निकम,इंदुमती गायकवाड,शितल आहेर, रोहिणी आहेर,मनिषा पाथरे,योगिता देवकर,लता लाठे,छाया सोनवणे, दिपाली सानप, संगीता सोनवणे यासह नांदगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर गटप्रवर्तक उपस्थित होत्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
