मनमाड एसटी कामगारांच्या आंदोलनाला आठवले गटाचा पाठिंबा

0

नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी महामंड मंडळाला राज्य सरकार मध्ये विलिनीकरण करण्याची मागणी व इतर मागणीसाठी पुकारलेल्या मनमाड एसटी शहर डेपो येथे पुकारलेल्या एसटी महामंडळाच्या कामगारांना आरपीआय ( आठवले गटा )चे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष माननीय वंदेशजी गांगुर्डे यांनी भेट देऊन रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा जाहीर केला. यावेळी उत्तर महाराष्ट्र युवा नेते गोरख चौधरी आणि मनमाड शहर युवक अध्यक्ष अजय पगारे आदीसह आंदोलन करते उपस्थित होते.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी कर्मचारी ( कामगार) यांच्या संपाला ( आंदोलनाला ) सुरुवात झाली आहे. एस टी महामंडळाला राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करा रिपब्लिकन ( आठवले गट ) संपकारी एसटी कामगारांच्या पाठीशी व त्यांच्या पंपाला दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी बुधवारी जाहीर पाठिंबा दिला.एसटी कामगारांच्या आत्महत्या आणि त्यांच्यावर आर्थिक वाताहल थांबा वयाची असेल तर एस टी महामंडळ राज्य सरकार मध्ये विलिनीकरण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या एसटी कामगारांच्या संपाला आर. पि. आय. राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आठवले गटाचा पूर्णपणे पाठींबा आहे.तसेच महाविकास आघाडी सरकारच्या अन्याय कारक धोरणांच्या विरोधात रिपब्लिकन आठवले गट एसटी कामगारांच्या आंदोलकाच्या समर्थनार्थ खंबिरपने उभे आहे.सर्व सामान्यां प्रमाणे एसटी कर्मचारी मागण्यासाठी दाद मागणाऱ्या एसटी कामगारांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. तुटपुंजा पगारावर गेले कित्येक वर्षापासून बस कामगार (कर्मचारी ) काम करीत आहे. परंतु कुठल्याही सरकारला मायेचा पाझर कुठला नाही. पगार वाढ आणि महागाई भत्ता न्याय मागणीसाठी आंदोलनाचे आश्र उभरणाऱ्या आंदोलकाची भुमिका चुकीची नाही.त्यामुळे जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्ष ( आठवले गट ) आंदोलका सोबत राहील असे पाठिंबा दिला पत्रामध्ये नमूद केले आहे. या पत्रकावर उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंन्देशजी गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र युवा नेते गोरख चौधरी, मनमाड शहर युवक अध्यक्ष अजय पगारे आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here