एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपास. किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष. शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा. तसेच आमदार दिलीप बोरसे व भाजपच्या विविध कार्यकर्त्यांचा पाठिंबा.

0

( प्रतिनिधी:- प्रशांत गिरासे बागलाण) 26 ऑक्टोंबर 2021 पासून महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे. न्याय व उचित मागण्यासाठी पुकारलेल्या संपात. बागलाण तालुक्यातील शहर अध्यक्ष. राहुल सोनवणे ,तालुका अध्यक्ष संजय देवरे, तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा, व बागलान चे आमदार दिलीप बोरसे, व माजी उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, अनिल पैलवान, तरसाळी सरपंच लखन पवार, संजय सूर्यवंशी तसेच संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बीजेपी. यांनी एसटी महामंडळ कर्मचारी यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळेस किसान मित्र बिंदू शेत शर्मा म्हणाले की आत्तापर्यंत. महाराष्ट्र मध्ये 37 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या आत्महत्या च्या कारणे ही निष्क्रिय सरकार आहे. त्यामुळे या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी. आणि मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटे सर्वांनी उभे रहावे .तसेच या सरकार ला न्याय देण्यास आपण भाग पाडू .कारण आपण आपला हक्क मागतो. तर भीक नाही मागत असे शर्मा यांनी सांगितले. पुढे शर्मा म्हणाले की. जर एसटी कर्मचाऱ्यांना शासनाने वेळेवर पगार दिला असता. व दिवाळी बोनस चांगल्या प्रकारे दिला असता . तर ही वेळ कर्मचाऱ्यांवर आलीच नसती असे सांगितले. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. तसेच एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे. या प्रमुख मागणीसाठी. सटाणा कळवण सह संपूर्ण राज्यात. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन. हा संप पुकारला आहे. तसे पाहिले तर एसटी सेवा ही गोरगरिबांसाठी. गेल्या पन्नास साठ वर्षापासून जनसेवा म्हणून कार्य करत आहे .आणि त्यामुळे जर एसटी कर्मचाऱ्यांना शासनाने शासकीय सेवेत सामावून घेतले नाही तर ही दुःखाची बाब आहे असे शर्मा म्हणाले. कारण एसटी कर्मचारी हे रात्र असो की दिवस. तो जिवाची पर्वा न करता. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा देतात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा तसेच एस टी महामंडळ. राज्य शासनाकडे वर्ग केल्यानंतर. आपोआप सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेल. व त्याप्रमाणेच त्यांना पगार व इतर अडीअडचणी बाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. म्हणून शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा हा दिलाच पाहिजे. असे भाजपचे कार्यकर्ते व किसान मित्र बिंदू शर्मा यांनी. एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here