समता मित्र मंडळ वतीने मनमाड शहर पातळीवर भव्य कब्बडी स्पर्धा

0

मनमाड:- समता मित्र मंडळ वतीने मनमाड शहर पातळीवर भव्य कब्बडी स्पर्धा भरविण्यात आली होती.सदर स्पर्धेत एकूण २७संघाने सहभाग घेतला.अंतिम सामना मनमाड बॉईज आणि अशोक क्रीडा मंडळ या दोन संघा मध्ये झाला.अटीतटीच्या या सामन्यांमध्ये मनमाड बॉईज अंतिम विजेता ठरला. बापुनगर जनार्दन नगर शेजारी, नगर चौकी रोड, मनमाड येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे,मा.नगराध्यक्ष व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे कार्याध्यक्ष राजाभाऊ पगारे, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सचिव मोहन अण्णा गायकवाड,सतिष सुर्यवंशी, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अलेक्झांडर मणी,माजी नगरसेवक सचिन दराडे, कामगार नेते अंबादास निकम, नगरसेवक लियकतभाई शेख, कामगार नेते प्रदीप गायकवाड, मा.नगरसेवक संजय निकम, नगरसेवक मिलिंद उबाळे, नगरसेवक संतोष अहिरे, संजय कटारे, प्रमोद गांगुर्डे व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अशोक गरूड, डॉ.शरद शिंदे, डॉ.दत्ता शिंपी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन राजेश निकुंभ व सुधाकर कातकडे यांनी केले तर आभारप्रदर्शन आकाश हिरवळे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समता मित्र मंडळ चे संस्थापक सदस्य व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे कार्यकारिणी सदस्य वाल्मिक बागुल व रोहन बागुल यांनी केले.या स्पर्धेचे प प्रथम, द्वितीय, तृतीय संघ पुढीलप्रमाणे (१) मनमाड बॉईज,(२) अशोक क्रीडा मंडळ (३) सांस्कृतिक क्रीडा मंडळ व शिस्त बंध संघ म्हणून भारत माता संघाची निवड करण्यात आली
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजित चौधरी,विजय त्रिभुवन,रवी बोहत, विनोद अहिरे, अविनाश केदारे,अनिकेत झोडपे, राहुल बागुल, राजरत्न बागुल, सुरेशं अहिरे, स्वप्निल बागुल, सागर वावळे, कृष्णा हिरे, गरूड, रमेश महिरे,चेतन गरूड, बबन तायडे, चंद्रमणी सुखदेव,सुनिल झोपडे, आनंद झोडपे,उज्ज्वल पगारे, सचिन तायडे,मयुर केदारे, सिध्दार्थ महिरे, सिध्दार्थ अहिरे,संघनिल पगारे, सम्यक बागुल, श्रीकांत उबाळे, कृष्णा पानसरे,सुरज सानप, सिद्धार्थ संसारे, संजय खाडे, अतुल घुमरे,साईल झाल्टे, ऋषिकेश झाल्टे, कृष्णा धात्रक, सुधीर कुसमाडे, विकास केदारे, सिद्धार्थ केदारे, अनिल साळवे, चंद्रमणी सोनवणे, आशिष पांडे,आदी प्रयत्नशील होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here