मनमाड मेडिकल असोसिएशनच्या डॉ.सौ.सोनाली गौरव पाटिल यांनी कॅरम मधे सुवर्ण व बॅड्मिंटन मधे ब्रॉंझ पदक मिळ्वुण मनमाडची मान उंचवीली

0

मनमाड : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) दिल्ली यांच्या विद्यमाने डॉक्टर्स ऑलम्पिक २०२१ हि स्पर्धा नाशिक येथे मोठ्या दिमाखात अनेक राज्यातील खेळाडुंच्या सहभागाने पार पडली.त्यात मनमाड मेडिकल असोसिएशनच्या डॉ.सौ.सोनाली गौरव पाटिल यांनी कॅरम मधे सुवर्ण व बॅड्मिंटन मधे ब्रॉंझ पदक मिळ्वुण मनमाडची मान उंचवीली आहे.त्यांनी हरियाणा,मध्य प्रदेश,दिल्ली व महाराष्ट्रातील जळ्गाव व औरंगाबादच्या प्रतीस्पध्यांवर मात करीत सुवर्ण पदक खेचुन आणले.
तसेच फुट्बॉल संघामधे डॉ.गौरव विजय पाटिल (लेप्रोस्कोपिक सर्जन ) मनमाड,यांनी चंढिगड , पुणे , केरळ येथील संघावर मात करुन रौप्य पदकावर नाशिकचे नाव कोरले आहे.डॉ.सागर दुकळे (नेत्ररोग तज्ञ ) यांनी देखील नेत्रदिपक कामगीरी केली.डॉ.सोनाली पाटिल याना बॅड्मिंटनसाठी कोच रोहित जगताप, मनमाड यांचे मार्गदर्शन लाभले.राष्ट्रिय पातळिवर असा पराक्रम करुन मनमाड्चे नावलौकिक केल्यामुळे सर्व स्थरातील खेळाडु,डॉक्टर व प्रतिष्टितांकडुन अभिनदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here