त्या’ इंदिरा गांधी होत्या

0

मुंबई : जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७: तेव्हा इंदिरा गांधी केंद्रात नभोंवाणी मंत्री होत्या. सहज राजीव गांधींना भेटायला परदेशात गेल्या होत्या. राजीवजींचे शिक्षण सुरु होते. आई केंद्रीय मंत्री, आजोबा देशाचे माजी पंतप्रधान. पण चेहऱ्यावर अजिबात त्याचा लवलेश नव्हता.तिकडे राजीवजींना भेटायला त्यांच्या रूमवर सोनियाजी अधूनमधून येत असत. आता दोघांची प्रीती इंदिराजींपासून लपूनही राहिली नव्हती. आपल्या होणाऱ्या सुनेला जवळ बसवून तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यात इंदिराजी तितक्याच आतुरतेने रमत असत. त्यांच्या देहबोलीत कुठेही सत्तेचा माज नव्हता. वडील देशाचे पंतप्रधान राहिले होते. मी स्वतः केंद्रीय मंत्री आहे, याचा जराही आविर्भाव नव्हता.नाही तर आताचे नेते, केंद्रीय मंत्री म्हणा किंवा पक्षाचे एखादे पदाधिकारी म्हणा…. अगदी जमिनीवरून दोन फुट वरून चालतात. त्यांना वाटतं आम्हीच सर्वस्व आहोत या जनतेचे… तरी नशिब काहींनी कशी पदे मिळवून घेतलीत ते त्यांना माहित आहे. काही बिचारे पक्षासाठी झिजून दुय्यमस्थानी काम करीत आहेत. ती लोकं इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी, राहुलजी आणि प्रियांकाजी यांच्या विचारांच्या काँग्रेसची असतात, बरं का… तेव्हा लगे रहो… थोडी अडकथा सांगितली सद्य: स्थितीची.तर इंदिराजी सोनियाजींशी राजीव गांधी, ज्या हॉस्टेलवर राहत होते, तेथे गप्पात रमल्या होत्या… आणि सहज इंदिराजींची नजर सोनियाजींच्या पायाकडे गेली. त्यांचा पायजमा थोडासा उसावला होता, पायाच्या वरच्या बाजूला.इंदिराजींनी त्याबद्दल विचारले आणि कपडे बदलायला सांगितले. त्या इतक्यावर नाही थांबल्या तर स्वतः पायजमा हातात घेतला. सुई दोरा मागून घेतला आणि स्वतःच्या हाताने तो पायजमा इंदिराजींनी शिवून सोनियाजींना दिला. इतक्या कोमल आणि लोण्याच्या हृदयाच्या कुटुंबवत्सल इंदिराजी होत्या.दुसऱ्या एका घटनेत इंदिराजी मनावर अधिराज्य करतात. संजय गांधी यांच्या विमान अपघाताची खबर मिळताच इंदिराजी सर्व कामे सोडून हॉस्पिटलकडे निघतात तेव्हा बंगल्यावर व्ही. पी. सिंग बसलेले होते. त्यांना भेटीची वेळ दिलेली होती. आणि दुसरी भेटी वेळ जनता पक्षाच्या अटल बिहारी वाजपेयी यांना दिलेली होती.इंदिराजी लगबगीने हॉस्पिटलकडे रवाना झाल्या. त्यांनी पाहिलं की, आपल्याच काळजाच्या तुकड्याचा देह निपाचित पडला आहे. त्यांना दुःख अनावर झाले होते. पण दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरले. भावना मनात कोंडून ठेवल्या.तोपर्यंत व्ही. पी. सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी तिथे आले होते. काँग्रेस नेत्यांची गर्दी हॉस्पिटलला झाली होती.तेवढ्यात इंदिराजींनी व्ही. पी. सिंग यांना बाजूला घेऊन सांगितले की, तुम्ही ताबडतोब उत्तर प्रदेशमध्ये जा आणि तुम्हाला दिलेल्या शब्दांप्रमाणे कामाला लागा. मी पुढचे बघून घेते.त्यानंतर त्यांनी अटलजींवर कटाक्ष टाकला. त्यांना नजरेने खुणावले आणि जवळ बोलावून घेतले. त्यांना म्हणाल्या, तुम्ही जम्मू काश्मीरच्या शिष्टमंडळाला तातडीने जाऊन भेटा. त्यांना मी वेळ दिली होती. त्यांची समजूत काढून मार्ग काढा. ती जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे.दोघेही आभाळाएवढे नेते एका आईपुढे उभे होते. त्यांना काहीच कळत नव्हते. समोर मुलाचा मृतदेह पडला असताना इंदिराजींना देशसेवेचा ध्यास लागला होता. दिलेला शब्द सत्यात उतरवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा पदर पसरून राजमार्ग निर्माण करणाऱ्या इंदिराजी म्हणजे भारत मातेला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. त्या स्वप्नातून काँग्रेस निर्माण झाली आणि वाढली. तीला कर्तृत्ववान लोकांची साथ मिळो, निष्ठावंत लाभोत आणि पक्ष वैचारिकतेच्या निकषावर भक्कम होवो… हिच आदरांजली.💐💐💐🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here