शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

0

नाशिक : वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे- किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त माळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , कोविडच्या काळात समाजासाठी झटणाऱ्या आरोग्यसेवकांचा त्यावेळी सन्मान करण्यात आला ,त्याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ.आडे, राजेश निकुंभ, किशोर सोनवणे, शांताराम आहेर ,उर्मिला सोनवणे,दिलीप निकुंभ इत्यादी आरोग्यसेवकांचा सन्मान करण्यात आला.रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून जाणीव पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब पगार ,जिल्हा परिषद सदस्या नूतनताई आहेर, युवा नेते संभाजी आहेर, उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा समन्वयक कुबेर जाधव,शिवसंग्रामचे युवक प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर,माळवाडी गावचे सरपंच शिवाजी बागुल, रामेश्वर गावचे उपसरपंच विजय पगार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सुनील आहेर,देवळा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ.डि के आहेर,डॉ. कोमल निकम, रोटरी क्लबचे प्रितेश ठक्कर, ग्रामसेवक संभाजी देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.”मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे आणि म्हणूनच इतर सर्व कार्यक्रम रद्द करून आम्ही रक्तदानाचे नियोजन केलेले होते आणि त्यात तब्बल 104 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती किसान युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी सुरज अहिरे यांनी दिली.त्यावेळी अजय यशवंते, भूषण बागुल ,रोहित शेवाळे ,मोहित वाघ, मुकुंद बागुल,शशिकांत शेवाळे, महेंद्र बागुल ,केतन आहेर, संजय जगदाळे,देवेंद्र बच्छाव , प्रविण गांगुर्डे, निलेश गुप्ता, ऋषिकेश खैरनार, किरण कुमावत,खुशाल पवार, विशाल बागुल,अनिल गोसावी,दावल भदाणे, संजय सोनवणे,प्रतीक बागुल,राहुल बागुल,दुर्गेश बागुल,वैभव बागुल यांच्यासह मोठया संख्येने तरुणांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here