लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा बसविण्यासाठी लाल सेनेचे धरणे आंदोलन

0

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा बसविण्यासाठी लाल सेनेचे धरणे आंदोलन मनमाड – नगरपालिकेने वीस वर्षापासून जागा दिलेली असून आजपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात आलेला नाही व याबाबत नगरपालिकेने कोणतेही काम केले नाही . गेल्या अनेक वर्षापासून सदर प्रकरण प्रलंबित असल्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे काम चालू करावे या मागणीसाठी लालसेनेच्या वतीने कॉ . जितेंद्र गायकवाड यांनी दि . 28 ऑक्टो . रोजी धरणे आंदोलन नगरपालिकेसमोर करण्यात आले . आंदोलनात अन्याय अत्याचार निर्मुलन समिती शाखा मनमाड , छावा लभान क्रांतीवीर सेना , आर . ए . ग्रुप मनमाड शाखा यांनीही पाठींबा दिला होता . सदर आंदोलनाची तात्काळ मुख्याधिकारी यांनी दखल घेऊन लाल सेनेचे प्रदेश अध्यक्ष कॉ . जितेंद्र गायकवाड यांना पत्र दिले शासन निर्णय अन्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वावुनार पुढील कार्यवाहीकरणे कामी दस्तावेज व अर्ज नगरपालिकेस सादर करावा जेणे करुन शासनास पाठविण्यात येईल असे मुख्याधिकारी यांनी पत्राव्दारे आश्वासन दिल्याने लाल सेनेच्या वतीने बेमुदत धरणे थांबविण्यात आले . यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ सोळसे , नगरसेवक लियाकतभाई शेख , ताराचंद सोळसे , तुषारभाऊ आहिरे , पिंटुभाऊ वाघ , सुरेखाताई ढाके , आर . ए . ग्रुपचे सागर आहिरे , मनोज भालेराव , अमित गरुड , मायाराम नवले , संजय सोळसे , शरद बेंद्रे , काशिनाथ गायकवाड , निशांत ढाके आदि उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here