दीपावली मध्ये आपल्या मालमत्तेची काळजी घ्या- रामेश्वर रेंगे ,पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन सिल्लोड शहर

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड शहर पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दीपावलीच्या काळात व इतर वेळी बाहेरगावी जाताना आपण आपल्या मालमत्तेची चोरी होऊ नये याकरिता आपण शेजाऱ्यांना त्याबाबत माहिती द्यावी व आपला मोबाईल नंबर त्यांना देऊन आपल्या घराकडे लक्ष ठेवणे बाबत सांगावे. बाहेरगावी जाताना घरामध्ये किमती वस्तू सोने चांदीचे दागिने ठेवू नयेत त्याच प्रमाणे इतर वेळी देखील दैनंदिन गरजे करिता लागणारी आवश्यक एवढीच रक्कम घरात ठेवावी घरातील मौल्यवान दागिने एकाच ठिकाणी ठेऊ नयेत घराचे खिडकी दरवाजे मजबूत करावेत मुख्य दरवाजा ला लोखंडी चॅनल गेट बसून घ्यावे आपण राहत असलेल्या कॉलनीमध्ये सामूहिक रित्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत ज्यामुळे कॉलनीत येणारे जाणारे व्यक्तींची माहिती मिळू शकते तसेच पोलीस स्टेशन सिल्लोड शहर येथे आपण किती कालावधीकरिता बाहेर गावी जाणार आहात याबाबत आपण आपले पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर याची नोंद करावी ज्यामुळे त्या कालावधीमध्ये आमचे पोलीस दिवसा व रात्रीच्या वेळी आपल्या घरास भेटी देतील व आपली मालमत्ता सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेतील,रामेश्वर रेंगे ,पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन सिल्लोड शहर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here