शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बस सेवा सुरळीत करावी

0

नाशिक : प्रशांत गिरासे वासोळ- मो.9130040024
देवळा-(दि.२६ ऑक्टोंबर) वाखारी गटाच्या जि.प. सदस्या डॉ.नूतन आहेर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोटूआबा आहेर यांच्या समवेत वाखारी येथिल महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार बसचे नियोजन करून बस सेवा सुरळीत करावी तसेच ग्रामीण भागातील खेडे गावांच्या फाट्यावर विद्यार्थ्यांना बघूनही बस थांबत नसल्याने, बस थांबवावी व त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा जेणेकरून कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होईल या मागणीचे निवेदन सटाणा येथे जाऊन सटाणा आगाराचे व्यवस्थापक बिरारी यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी बिरारी यांनी सकारात्मक आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिटणीस मुन्ना पवार, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी कल्याणी पवार, वैभवी पवार, प्रियंका पवार, सविता चव्हाण, निकिता बागुल, गायत्री चव्हाण, निलेश पवार, उमेश पवार आदी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here