सिल्लोड शहरातील जुन्या गावात असणाऱ्या हेमांडपंती महादेव मंदिरासमोर भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ऐतिहासिक असा बारव मागील अनेक वर्षांपासून प्रचंड घाणीचे साम्राज्य

0

सिल्लोड – प्रतिनिधी विनोद हिंगमीरे : दरवर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने केवळ एक दिवसासाठी या बारवातील संपूर्ण घाण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने काढण्यात येती त्यानंतर मात्र संपूर्ण वर्षभर या बारवांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असते अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या बारवाला नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने संरक्षण जाळी बसविण्याची गरज आहे मागील अनेक वर्षांपासून या बारवाच्या आजूबाजूला ही मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले राहात असल्याने महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचा या घानीकडे पाहून नेहमीच हिरमोड होत असतो सिल्लोड शहर नगर परिषद प्रशासनाने भाविकांच्या भावना लक्षात घेऊन या बारवा ची स्वच्छता करून बारव कायमस्वरूपी कसा स्वच्छ राहील यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे. प्रतिक्रिया-सुधाकर सोनवणे माजी नगरसेवक भाविक भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने या भारताची स्वच्छता करून बारवाला संरक्षण जाळी बसवून सदरील बारव कायमस्वरूपी स्वच्छ कसा राहील यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here