कोणतेही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहीम

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७- प्रभाग क्रमांक १ च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या पुढाकाराने दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर मध्ये आज विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मुंबईतील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी ही विशेष लसीकरण मोहीम घेण्यात आली. गणपत पाटील नगरात घेण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेमुळे येथे राहणाऱ्या पुरावा नसलेल्या हजारो नागरिकांना सहभागी होत लस घेतली.आपल्या प्रभाग क्रमांक १ कुणीही नागरिक लसी पासून वंचित राहू नये यासाठी घोसाळकर यांनी पाठपुरावा केला होता प्रभाग क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती तेजस्वी घोसाळकर यांनी दिली.याप्रसंगी माजी नगरसेवक मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला संघटक ज्यूडीथ मेंडोसासहित कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here