पिंपळगाव बसवंतला दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी

0

नाशिक : प्रशांत गिरासे विषेश प्रतिनिधी: कांदा व्यापा-यांच्या पाठोपाठ दोन द्राक्ष व्यापाऱ्यांवर धाड,कांदा, द्राक्षाचे आगर म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव बसवंत नगरीत सलग दुसऱ्या दिवशी देखील पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाच्या पथकांनी सहा कांदा,व्यापाऱ्यांसह दोन निर्यातदार द्राक्ष व्यापाऱ्यांवर सायंकाळीपर्यंत छापमारी करत तपासणी केल्याने स्थानिक व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.दिवाळी तोंडावर येऊन ठेपल्याने एकीकडे पिंपळगाव बाजार समितीत कांदा दराने साडेचार हजारांचा पल्ला गाठला आहे.तर दुसरीकडे दिवाळी हंगामात कांदा तेजीत राहणार असल्याने कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी आयकर विभागाच्या सहा पथकातील वेगवेगळ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शहरातील सहा प्रतिष्ठित कांदा व्यापाऱ्यांवर गुरुवार दि.२१रोजी छापमारी करत व्यालार्यांच्या गोडावून, कार्यालय, आडत, दुकाने, घर आदी जवळपास १३ ठिकाणी आयकर विभागाच्या पथकाने झाडाझडती करण्यात केली होती. तर शुक्रवार दि.२२रोजी सलग दुसऱ्या दिवशी आयकरच्या पथकाने पुन्हा त्याच कांदा व्यापाऱ्यांच्या स्थळी धडक मारत सायंकाळी पर्यंत चौकशी केली.तर अन्य दोन द्राक्ष व्यापाऱ्यांवर देखील छापमारी केल्याची चर्चा शहरात रंगल्याने पिंपळगावच्या कांदा-द्राक्ष व्यापाऱ्यांत घबराटीचे वातावरण कायम आहे.@@ आयकर विभागाचे अधिकारी मुक्कामी.पिंपळगाव शहरातील गुरुवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात शहरातील सहा कांदा व्यापाऱ्यांवर सकाळपासून रात्रीपर्यंत छापमारी केली.रात्री मुक्काम करून सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.२२रोजी पुन्हा सहा कांदा व्यापाऱ्यांसह दोन द्राक्ष व्यापाऱ्यांवर छापमारी केल्याने घबराटीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here