विजयादशमी निमित्त कापूस खरेदीचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !

0

मुंबई :जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७- सिल्लाेड: सिल्लोड शहरालगत पिंप्री फाट्याजवळ असलेल्या भगवान बाबा जिनिंग प्रेसिंग येथे विजयादशमी निमित्त कापूस खरेदीचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रथम कापूस खरेदी करण्यात आलेल्या गेवराई सेमी येथील शेतकरी श्री. रामदास आसाराम पाटील यांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई निकम, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार,सयाजी वाघ, विशाल जाधव, यासीनसेट बागवान, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर,भगवान बाबा जिनिंग प्रेसिंग चे संचालक हरिदास ताठे, सतीश ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here