मनमाड शहरात आमदार अण्णा कांदे यांच्यातर्फे “शितशव पेटीचे” लोकार्पण

0

मनमाड : मनमाड शहरात अनेक वेळा निधन झालेल्या व्यक्तींचे आप्तेष्ट दूर असल्यास अंत्यविधी उशिरा करावा लागतो. अशा वेळेस निधन झालेल्या व्यक्तींचे शव सुस्थितीत ठेवण्यासाठी शीतशव पेटीची नितांत गरज होती. त्याची मागणी अनेक दिवसापासून होत होती. त्याची गरज व गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मनमाड शहरासाठी “शीतशव पेटी” उपलब्ध करून दिली. त्याचे लोकार्पण ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ.नरवणे यांच्या हस्ते व उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ बळीत, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, गुलाब भाऊ भाबड, मुन्ना भाऊ दरगुडे, दिनेश केकान, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कक्षाचे पिंटूभाऊ वाघ रुग्णकल्याण समितीचे दिनेश घुगे, महेंद्र गरुड, विशाल सुरवसे, सचिन दरगुडे, दीपक दरगुडे, मच्छिंद्र सांगळे, कृष्णा जगताप, नंदू पीठे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. शितशव पेटीचे लोकार्पणाबद्दल शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले. कुणाही गरजूंना ही सेवा लागल्यास त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मालेगाव नाका येथे संपर्क साधावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here