अल्पभूधारक शेतकरी महिलांना एस. एस. पी. संस्थे मार्फत भाजीपाला बियाणे व सेंद्रिय औषधाचे मोफत

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे : गावातील महिलांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवडीचा केला निर्धार.. ब्रेकिंग द चैन अ मल्टी सेक्टर ॲप्रोच टू ऍड्रेस माल न्यूट्रिशन इन महाराष्ट्र. या प्रकल्पासाठी जी आय झेड व डब्ल्यू एच एच यांच्या संयोगाने स्वयं शिक्षण प्रयोग संस्था सिल्लोड व सोयगाव या तालुक्यातील 50 गावांमध्ये अल्पभूधारक शेतकरी महिलांसोबत काम करत आहे. या प्रकल्पाअंतर्गत सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील 500 अल्पभूधारक शेतकरी महिलांना आठ प्रकारच्या भाजीपाला बियाणाचे व सेंद्रिय औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. यामागील उद्देश महिलांनी घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करून त्याचा आहारामध्ये समावेश करावा, आहारातील विविधता वाढेल, त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल व त्यांचा खर्च कमी होईल. बियाणे वाटप नंतर महिलातील भाजीपाला लागवडीचा उत्साह वाढला आहे. यासाठी सर्व महिलांना संस्थेच्या प्रकल्प मॅनेजर तबस्सुम मोमीन, जिल्हा समन्वयक माधव गोरकट्टे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. त्याचप्रमाणे तालुका समन्वयक माधुरी दूधभाते व कोराळा तांडा गावातील लीडर मंगल राठोड या कार्यासाठी अधिक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here