कोष्टी व्हिजन ट्रस्ट तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

0

मुंबई : (गुरुनाथ तिरपणकर) -एकसंघ समाज व विधायक उपक्रमांकरिता स्थापित कोष्टी व्हिजन ट्रस्ट तर्फे नवरात्रव उत्सवानिमित्त कोष्टी समाजातील कुमारिका,महिला व माता भगिनी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.गेली दिड वर्ष व त्याहुनही अधिक काळात कोरोना महामारीमुळे कुटुंब बंदिस्त असल्यासारखे वातावरण झाले होते. जीवनामध्ये एक प्रकारची गतिशुन्यता येऊन निरुत्साह व नैराश्याचे वातावरण सर्वदुर होते.नवरात्रव उत्सवाच्या निमित्ताने कोष्टी व्हिजन ट्रस्टने कोष्टी समाजातील महिलांसाठी सेल्फी विथ रांगोळी,अभंग व भजन,सोलो डान्स,पाककला, कुमारिका विशेष गुणदर्शन,ग्रुप पेहराव या व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन या सर्व स्पर्धा ऑनलाईन होणार आहेत.या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख १६ऑक्टोबर २०२१असुन याबाबत अधिक माहिती ९५७९९३२४४२या क्रमांकावर वाॅटस मॅसेज केल्यास उपलब्ध होईल.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन कोष्टी व्हिजन ट्रस्टचे सचिव श्री.सचिन टकले(देवांग)यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here