कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी रविंद्र बच्छाव यांना विशेष कार्यसन्मान पुरस्कार प्रदान

0

प्रशांत गिरासे देवळा: बागलानचे भूमिपुत्र तथा वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रविंद्र(रविराज)बच्छाव यांना नुकताच दै. लोकमंथन, साई सावली फाऊंडेशन, पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात येणारा कार्य सन्मान पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक सेवाभावी कार्य,वृक्षारोपण व संवर्धन, कार्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यातील मैत्रीचे नाते जपले गेले इत्यादी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बच्छाव यांना हा पुरस्कार मिळाला.नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी आमदार संजय चव्हाण , पोलीस उपअधिक्षक सूर्यवंशी साहेब,सटाना पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार साहेब ,जायखेड़ा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी , साहेब ,वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र शिंदे ,देवमामलेदार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड ,अरविंद सोनवणे, कुमार कडलग साहेब,आयोजक संतोष जाधव,प्रशांत कोठावदे आदी उपस्थित होते.रविंद्र बच्छाव यांचा त्यांच्या कार्यामुळे कायमस्वरूपी गौरव होत असतो. बच्छाव यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here