एसबीसी संघर्ष समितीची आरक्षण बचावासाठी लोणावळा येथे चिंतन बैठक

0

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५० टक्केच्यावरील आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे एसबीसीचे दोन टक्के आरक्षणवर कु-हाड कोसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी संपूर्ण राज्यातील (विशेष मागास प्रवर्ग) एसबीसीचे रविवार दि. १०.१०.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता पाटील फार्म हाऊस वर्सोली, मनशक्ती केंद्रासमोर, रिद्ध-सिद्धी हॉटेलच्या बाजुला, लोणावळा,येथे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी विशेष मागास प्रवार्गामधील सर्व समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एसबीसी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत आमणे यांनी केले आहे.सदर शिबारासाठी मुंबई जिल्ह्यातील समितीचे नेते श्री. विजय निमणकर, नंदू डंबाळ, नरेंद्र वाघ, सचिन पद्मन नियोजन करणार आहेत तरी नियोजनाच्या दृष्टीने आपण https://forms.gle/SStfhAeAtN8PiWzz7 या लिंकद्वारे फॉर्म भरून आपली उपस्थिती निश्चित करावी व एसबीसी आरक्षण बचाव मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन महेश फलके, संजय कुमठेकर, व अक्षय तारळकर आदीपदाधिकार्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here