मानसिक आरोग्य तपासणी व ताणतणाव नियोजन शिबीर

0

नाशिक : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 5 ऑक्टोबर रोजीआयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात एकूण 32 रुग्णांनी उपचार घेतला तसेच 50 पेक्षा जास्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी ताण-तणाव नियोजन सत्राचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री संभाजी दादा आहेर उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांबळे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. निलेश जेजुरकर यांनी मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.समाजसेवा अधीक्षक श्री अगोने, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता श्री पाईकराव यांनी शिबीराचे यशस्वी व्यवस्थापन पाहिले. समुपदेष्टा श्रीमती सायली बोंद्रे यांनी उपस्थित रुग्ण व नातेवाईक त्यांचे समुपदेशन केले. कम्युनिटी नर्स श्रीमती शीतल अहिरराव यांनी औषधवाटप व पुनर्तपासनी बाबत रुग्णांना मदत केली.ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश अहिरे, डॉ बच्छाव, डॉ.बोरसे, आयसीटीसी समुपदेशक श्री.प्रवीण देवरे, एनसीडी समुपदेशक श्री शिवाजी गांजे, औषधनिर्माण अधिकारी श्रीमती वैशाली कांबळे, व कर्मचारी यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here