संभाजी ब्रिगेड तर्फे तहसीलदारांना निवेदन- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ करावी,

0

सिल्लोड प्रतिनिधी- विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी मूळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरु करण्यात आले असून आता शेतकर्‍यांच्या नजरा शासकीय मदतीकडे लागल्या आहेत. हाता तोंडाशी आलेला घास सततच्या पावसामुळे हिरावला आहे शेतात साचलेले पाणी व पिकांचे नुकसान पाहून शेतकर्‍यांच्या काळजाचे पाणी पाणी होत असल्याचे विदारक चित्र सध्या सिल्लोड तालुक्याचे चित्र आहे तालुकाभर आठ ते दहा दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशा दाणादाण उडाली आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी तसेच सिल्लोड तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन 50 हजार रुपये हेक्टरने भरपाई देण्यात यावी.असे मागणी तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे.निवेदनात नमूद केले आहे की अतिवृष्टीमुळे कपाशीच्या बोड्या सडण्यास सुरुवात झाली आहे.सोयाबीन पिकाना देखील काही ठिकाणी अंकुर फुटत असल्याने उत्पादन घटण्याची भिती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर मका,आद्रक,कपाशी, सोयाबीन,बाजरी सह पिकांचे 100% नुकसान झाले असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास निर्सगाने हिसकावून घेतल्याने शेतकरी आर्थिक चिंचवेत सापडला आहे. यावेळी प्रताप मुरमे,तुकाराम फरकाडे आदिंचे निवेदनावर सह्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here