नागरी नाशिक-२ प्रकल्पात राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चा सांगता समारोह उत्साहात. कोरोना नियमांचे पालन

0

नाशिक 👉राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ हा दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२१ अखेर साजरा केला गेला.”कुपोषण छोड पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर” ही टॕग लाईन घेवून पोषण महिना साजरा झाला.नागरी नाशिक-२ प्रकल्पातील १०० अंगणवाडी केंद्रांना हा पोषण महिना साजरा करण्यासाठीचे दैनंदिन उपक्रमांचे आगाऊ वेळापत्रक देण्यात आलेले होते.कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता..पोषण महिन्यात जनजागृती करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करण्याचे आगाऊ नियोजन नागरी नाशिक-२ प्रकल्पात आॕगस्ट २०२१ मध्येच करण्यात आले होते..यासाठी सर्व मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची दोन वेळा आॕनलाईन बैठक घेण्यात आली होती..सर्वांशी चर्चा करुन पोषण महिन्याचे नियोजन करण्यात आले होते..प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः पुढाकार घेवून विविध थिमवर आधारित छोटे-छोटे परंतु तितकाच प्रभावी संदेश देशभरातील जनतेपर्यंत पोहोचतील असे व्हिडिओ कुठल्याही व्यावसायिक आयुधांचा वापर न करता तयार केलेत..यासाठी या सेविकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही अतिरिक्त वेळ देवून कामकाज केले..जन आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी सदर सर्व व्हिडिओ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे पालक यांना व्हाट्सअपचे माध्यमातून पाठविण्यात आले..तर पोषण अभियान हे एक जन आंदोलन असल्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, शेअर चॕट इ. सोशल मिडिया साधनांचा वापर करुन देशभरात हे व्हिडिओ पोहोचविले…यात प्रकल्पातील अंगणवाडीताई अन्नपूर्णा अडसुळे, सुहासिनी कसोटे, वंदना हिवाळे, कुसुम कासव यांचे संपूर्ण कुटुंबच या जन आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेले होते. प्रकल्पातील संपूर्ण टिमच यात सक्रिय होती.तसेच प्रकल्पाने या माध्यमातून “पोषणाच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठीचे” व्हिडिओद्वारे तयार केलेले संदेश सोशल मिडियाचे माध्यमातून देशभरातील जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहोचविले.व्हिडिओ तयार करणाऱ्या ताईंच्या टिमने फार मेहनतीने कामकाज केले..सर्व मुख्यसेविका,अंगणवाडी सेविका, मदतनिस व गट समन्वयक यांनी पोषण महिना यशस्वी करण्यासाठी एकजूटीने कामकाज केले.. लाभार्थी सर्वोच्च हित डोळ्यासमोर ठेऊन यापुढेही आमची टिम असेच कामकाज करत राहिल असे प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here