राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये सोशल मिडियाचे माध्यमातून जनजागृती करण्यासाठी भगूर येथिल अंगणवाडी केंद्र क्र.५६ च्या अंगणवाडी सेविका रेखा शिंदे व मदतनिस कविता बर्वे यांनी बजावली आपल्या टिमसाठी मार्गदर्शकाची भूमिका – शितल गायकवाड मुख्य सेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक👉राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ हा दिनांक १ ते ३० सप्टेंबर अखेर साजरा केला जात आहे.”कुपोषण छोड पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर” ही टॕग लाईन घेवून पोषण महिना साजरा केला जात आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पातील १०० अंगणवाडी केंद्रांना हा पोषण महिना साजरा करण्यासाठीचे दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे..कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता. पोषण महिन्यात जनजागृती करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करण्याचे आगाऊ नियोजन नागरी नाशिक-२ प्रकल्पात आॕगस्ट २०२१ मध्येच करण्यात आले आहे..यासाठी सर्व मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांची दोन वेळा आॕनलाईन बैठक घेण्यात आली.. या बैठकीत प्रकल्प कार्यक्षेत्रातील भगूर येथील अंगणवाडी केंद्र क्र. ५६ च्या अंगणवाडी सेविका रेखा शिंदे व मदतनिस कविता बर्वे यांनी सोशल मिडिया साधनांचा प्रभावी वापर कसा करता येईल याचे मार्गदर्शन प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना केले.सर्वांशी चर्चा करुन कामकाजाचे नियोजन करण्यात आले..प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी स्वतः पुढाकार घेवून विविध थिमवर आधारित छोटे-छोटे परंतु तितकाच प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचेल असे व्हिडिओ कुठल्याही व्यावसायिक आयुधांचा वापर न करता तयार केले.जन आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी सदर सर्व व्हिडिओ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे पालक यांना व्हाट्सअपचे माध्यमातून पाठविण्यात आले..तर पोषण अभियान हे जन आंदोलन असल्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, शेअर चॕट इ. सोशल मिडिया साधनांचा वापर करुन आमच्या टिमने हे जन आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे..यासाठी रेखा शिंदे व कविता बर्वे यांनी आमच्या टिममधील सर्वांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले..तसेच त्यांनी स्वतः पुढाकार घेवून प्रकल्पाचे कामकाज विविध सोशल मिडिया साईटवर सादर केले.त्याबद्दल त्यांचे प्रकल्पात कौतुक केले जात आहे.तसेच आम्ही या माध्यमातून “पोषणाच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठीचे” व्हिडिओद्वारे तयार केलेले संदेश जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहोचविले असल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here