मुंबई-दादर-नायगाव : अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची बैठक महामंडळाच्या दादर-नायगाव येथील कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महामंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे वार्षिक दिनदर्शिका २०२२ प्रकाशित करण्याचे सर्वानुमते ठरले. सदर दिनदर्शिकामध्ये मराठी चित्रपट निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आदि व्यक्तींचे छायाचित्र व जन्मतारीख प्रसिद्ध करण्यात येणार असून सोबत २०२२ मध्ये येणार्या चित्रपटांची माहिती तसेच चित्रपटा संदर्भातील घडामोडी उपल्ब्ध होणार आहे. तेव्हा ज्यांना आपले छायाचित्र आणि आपली जन्मतारीख निर्माता महामंडळाच्या दिनदर्शिकेत प्रसिद्ध करायची असेल त्यानी अध्यक्ष देवेंद्र मोरे यांच्याकडे या ९५९४८४८२९० नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच २२ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना.उध्दवजी ठाकरे साहेब यांनी घेतला त्याबद्दल त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांच्याप्रती धन्यवाद या बैठकीत मानण्यात आले. सदर बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, खजिनदार राजु शेवाळे,महाराष्ट्राचे प्रसिद्दी प्रमुख महेश्वर तेटांबे,सचिव सुरेश सोनावणे, सल्लागार नागेश गंगावणे आदि मंडळी उपस्थित होते.धन्यवाद,अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ,देवेंद्र मोरे – अध्यक्ष