राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत गर्भवती महिलांसाठी आॕनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजनशितल ठुबे (गट समन्वयक) एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक : 👉१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ साजरा केला जातो आहे.या कालावधीत घ्यावयाच्या विविध उपक्रमांचे दैनंदिन वेळापत्रक अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहे.अंगणवाडी केंद्रामार्फत कार्यक्षेत्रातील गर्भवती महिलांना वैद्यकीय,पुरक पोषण आहार या सेवा दिल्या जातात..गरोदरपणात महिलेने स्वतः ची व आपल्या पोटातील बाळाची कशी काळजी घेतली पाहिजे.याबाबत वेळोवेळी गृहभेटीद्वारे व लसिकरणाचे वेळी अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती व मदतनिस (AAAA) यांचे मार्फत गर्भवती महिलांना मार्गदर्शन केले जाते.गर्भवती महिलांचे ज्ञानात भर पडावी व त्यांनी स्वतः सह आपल्या पोटातील बाळाची योग्यती काळजी घ्यावी.यासाठी राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीत गर्भवती महिलांसाठी आॕनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन नागरी नाशिक-२ प्रकल्पात करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गर्भवती महिलांना १० प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत..आॕनलाईन पध्दतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गर्भवती महिलांना सहभागाचे प्रमाणपत्रही दिले जाणार असल्याची माहिती गट समन्वयक शितल ठुबे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here