सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन व राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही स्वतः तयार केलेले जनजागृतीसाठीचे व्हिडिओ जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहोचविले- अन्नपूर्णा अडसुळे अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२

0

नाशिक : 👉१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जातो आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अधिनस्त कार्यान्वित नाशिक, मनमाड, येवला, भगूर येथिल सर्व अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात पोषण महिना सप्टेंबर २०२१ साठीच्या दैनंदिन वेळापत्रकानुसार उपक्रमांचे आयोजन केले जाते आहे..यात कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता प्रकल्पाने आॕगस्ट २०२१ मध्येच पोषण महिना सप्टेंबर २०२१ साजरा करणेसाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यासाठीचे नियोजन केले होते.यासाठी सुहासिनी कसोटे, अन्नपूर्णा अडसुळे, पुष्पा वडजे, कुसुम कासव,अलका लोखंडे,सविता तायडे, पद्मा निरभवणे, वंदना हिवाळे, किर्ती पाचपांडे इ. अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घेवून पोषण आभियानाची मुळ उद्दिष्टे व त्यावर आधारित थिमवर पारंपरिक लोककलांचे माध्यमातून जनतेसमोर संदेश पोहोचविण्यासाठी मोठी मेहनत घेतली..”पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी” उभारल्या जात असलेल्या जन आंदोलनात सोशल मिडियाचा वापर प्रभावी ठरणार असल्याची जाणीव झाल्याने हे सर्व कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या सर्व अंगणवाडीताईंनी सुट्टीच्या दिवशीही कामकाज करुन मोठी मेहनत घेतली..त्यांनी तयार केलेले सर्व व्हिडिओ हे प्रकल्प कार्यक्षेत्रात जनजागृतीसाठी वापरले जात आहेत..तसेच हे सर्व व्हिडिओ फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, शेअर चॕट, इ. सोशल मिडिया साईटच्या माध्यमातून जगभरात पोहोचले आहेत..तसेच हे सर्व व्हिडिओ आॕल इंडिया आयसिडीएस, महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ यांच्या सोशल मिडिया साईटवरही पाठविण्यात आले आहेत.. या ताईंनी घेतलेल्या मेहनतीचे व त्यांनी केलेल्या योग्य नियोजनाचे सर्वच स्तराहून कौतुक केले जात आहे..तसेच जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोषणाचा संदेश पोहोचवून या टिमने जन आंदोलनाचा हेतू साध्य केल्याचेही बोलले जात आहे..याकामी या सर्व अंगणवाडीताईंना पुष्पा वाघ व शितल गायकवाड या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती राष्ट्रीय स्तरावर २०१९ साली पोषण अभियानाने सन्मानीत अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here