
नाशिक: 👉 १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ साजरा केला जातो आहे.या कालावधीत घ्यावयाच्या दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत कार्यान्वित सर्व अंगणवाडी केंद्रांना देण्यात आले आहे.० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रामार्फत विविध सेवा दिल्या जातात..बालकांची पोषण स्थिती योग्य आहे किंवा कसे हे ठरविण्यासाठी प्रत्येक महिन्याला अंगणवाडी सेविका बालकांची वजन व उंची घेतात..यावरुन बालकांची श्रेणी ठरविली जाते.मध्यम कुपोषित व तिव्र कुपोषित बालके ही जास्त जोखमीची असतात.त्यामुळे अशा बालकांची विशेष काळजीही घेतली जाते..राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये लाभार्थींची वजन व उंची घेवून त्यांची श्रेणी ठरविण्यात आली..यात विशेष करुन मध्यम कुपोषित (मॕम) व तिव्र कुपोषित (सॕम) बालकांसाठी Special CBE (विशेष समुदाय आधारित कार्यक्रम) राबवून अशा बालकांचे श्रेणी वर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे.प्रकल्पांतर्गत माहे जुलै २०२१ पासून हे विशेष प्रयत्न केले जात आहेत.अशा बालकांचे पालकांना अमायलेज युक्त पिठ (ARF) कसे तयार करावे.या पिठाचा बालकांसाठीचा रोजच्या आहारात कसा व किती प्रमाणात समावेश करावा याचे प्रात्यक्षिक यापूर्वीच करुन दाखविलेले आहे..त्यानुसार पालक ही बाब करतही असल्याची व यामुळे बालकांचे वजनात वाढही होत असल्याची माहिती मयूरी महिरे यांनी दिली.
