AAAA&Ls च्या उत्कृष्ट समन्वयाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत सर्वच विभागात अॕनिमिया तपासणी,उपचार व समुपदेशन शिबीराचे यशस्वी आयोजन – शितल गायकवाड मुख्यसेविका

0

नाशिक : 👉राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ अंतर्गत दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत “पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणेसाठी” दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रकानुसार आयोजन केले जात आहेत. नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, मदतनिस व मुख्यसेविका (AAAA&Ls) यांचा उत्तम समन्वय आहे..खर तर क्षेत्रीय स्तरावर कामकाज करत असतांना हा समन्वय अत्यंत महत्वाचा आहे..त्यामुळे अंगणवाडीतील लाभार्थींना सेवा देणे सुकर होते.अॕनिमियाचे प्रमाण कमी करणे हे पोषण अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे..पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये शहरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नाशिक महानगरपालिका यांचे समन्वयाने मोरवाडीगांव, सातपूर, मखमलाबाद, म्हसरुळ, रोकडोबावाडी, देवळालीगांव या ठिकाणी गरोदर महिला व किशोरवयीन मुली यांचेसाठी अॕनिमिया तपासणी, उपचार व समुपदेशन शिबीराचे यशस्वी आयोजन केल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here