एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अधिनस्त कार्यान्वित अंगणवाडी केंद्रांमध्ये ARF (अमायलेज युक्त पिठ) प्रात्यक्षिक व पाककृतीं प्रदर्शनाचे आयोजन – पुष्पा वाघ मुख्यसेविका

0

नाशिक:  👉१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जातो आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत १०० अंगणवाडी केंद्र नाशिक महानगरपालिका, तसेच मनमाड, येवला व भगूर नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यान्वित आहेत..या ठिकाणी असलेल्या अंगणवाडी केंद्रांचे कार्यक्षेत्रातील ० ते ६ वयोगटातील मध्यम कुपोषीत (mam) व तीव्र कुपोषीत (sam) बालकांच्या वजनवाढीसाठी व त्यांच्या श्रेणीत सुधारणा घडवून आणण्यासाठी Special CBE (विशेष समुदाय आधारित कार्यक्रम) राबविला जात आहे..या बालकांचे वजन वाढीसाठी यात ARF (अमायलेज युक्त पिठ) चा वापर करुन पाककृती तयार केली जात आहे..त्यामुळे बालकांच्या वजनातही वाढ होत आहे..नागरी नाशिक-२ प्रकल्पात कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन यासाठीचे प्रशिक्षण यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे..तसेच नियमित CBE कार्यक्रमांसोबतच जुलै २०२१पासून Special CBE कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे..यात प्रत्येक लाभार्थीसाठी स्वतंत्र दैनंदिन ठेवण्यात आलेली आहे..तसेच पालकांना अमायलेज युक्त पिठ कसे तयार करावे याचे मार्गदर्शनही यापूर्वीच करण्यात आलेले आहे..लाभार्थीचे पालक त्यानुसार पिठ तयार करुन व बालकांसाठी तयार केलेल्या प्रत्येक वेळच्या आहारात त्याचा १ चमचा वापरही करत आहेत..यामुळे अनेक बालकांची श्रेणीही सुधारत आहे..राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे निमित्ताने याबाबींना उजाळा म्हणून प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांच्या कार्यक्षेत्रात याबाबतीत प्रात्यक्षिक व पाककृती प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केल्याची माहिती मुख्यसेविका पुष्पा वाघ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here