एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ मधील अंगणवाडीताईं व मदतनिसताईंचा राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ चे कालावधीतील “नाविन्यपूर्ण उपक्रम” सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन “मुंबई स्वयंपाकघर” या फेसबुक पेजवरुन लाभार्थींचे पालक व इतरही नागरिकांना दिली जाते आहे.स्थानिक पाककृतींची माहिती..व्हाट्सअप व इतर सोशल मिडिया साधनांचा केला जात आहे वापर- सुज्ञा खरे मुख्यसेविका

0

नाशिक : 👉सर्वत्र राष्ट्रीय पोषण महिना हा १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा केला जातो आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अतर्गत १०० अंगणवाडी केंद्रांतही या महिन्यातील उपक्रमांचे दैनंदिन वेळापत्रकानुसार आयोजन केले जात आहे..यावेळची सप्टेंबर २०२१ पोषण महिन्यातील मुळ थिम “कुपोषण छोड पोषण की ओर…थामे क्षेत्रीय भोजन की डोर” यावर आधारित आहे..म्हणजेच कुपोषण हटविण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात स्थानिक आहाराचा वापर करावयाचा आहे..हा स्थानिक आहार आपल्या पोषणासाठी कसा योग्य आहे.याबाबत या संपूर्ण महिन्यात जनजागृती करावयाची आहे..पोषण अभियान हे एक जन आंदोलन आहे..त्यामुळे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोषणाचा योग्य संदेश पोहोचणे व त्याद्वारे पोषणाचे वर्तणात बदल घडवून आणणे अभिप्रेत आहे..कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ नियमावलीचे पालन करुन (नागरी) नाशिक-२ प्रकल्पात सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन जनजागृती केली जात आहे.स्थानिक आहाराचे महत्व पटवून देत असतांना अंगणवाडीताई, मदतनिसताई या स्वतः स्थानिक पदार्थांचा वापर करुन उपयुक्त अशा पौष्टिक पाककृती तयार करत आहेत..या पाककृती तयार करतांना वापरावयाच्या साहित्यासह संपूर्ण माहिती सोशल मिडियाद्वारे जनतेसमोर सादर केली जात आहे..यात “मुंबई स्वयंपाक घर”या फेसबुक पेजवरही माहिती पाठविली जाते आहे..त्यातून काही पाककृती शिदोरी पेजवरही निवडल्या जात आहेत..फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, शेअर चॕट इ. माध्यमातूनही नागरिकांपर्यंत स्थानिक पाककृतींची माहिती पाठविली जात आहे..राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मधील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनेक स्तरावरुन कौतुक केले जात असल्याची माहिती मुख्यसेविका सुज्ञा खरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here