नाशिक : 👉 दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जात आहे..एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत नाशिक, मनमाड, येवला भगूर येथील सर्व अंगणवाडी केंद्रांत पोषण महिना सप्टेंबर २०२१ च्या दैनंदिन वेळापत्रकानुसार मंगळवार दिनांक २१/०९/२०२१ रोजी पहिल्या व दुसऱ्या तिमाहीतील गर्भवती महिलांसाठी आहारातील विविधता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आॕनलाईन CBE (समुदाय आधारित कार्यक्रम) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..यात अंगणवाडी सेविकांनी या विषयावर स्वतः तयार केलेले मार्गदर्शनपर व्हिडिओ संबंधित महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना आहारातील विविधतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.यात गरोदरपणाचे कालावधीत कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे..तसेच आई व पोटातील बाळाची सुरक्षितता, सुदृढ बालकाचे जन्मासाठी आईने कशी काळजी घेतली पाहिजे..तसेच आईने किती आहार या काळात घ्यायला हवा..याबाबत अंगणवाडी सेविका यांनी आॕनलाईन मार्गदर्शन केले..अशाच प्रकारे एकूण दोन आॕनलाईन CBE (समुदाय आधारित कार्यक्रम) राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ कालावधीत सर्व अंगणवाडी केंद्रांत घेतल्याची माहिती मुख्यसेविका पुष्पा वाघ यांनी दिली.
Home Breaking News एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अधिनस्त सर्व अंगणवाडी केंद्रांत...