सिल्लोड – प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या दोन वर्षापासून आरोग्यसेविका हे पद रिक्त असून अनेक वेळा मागणी करुनही आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णाचे हाल होत असून नाईलाजाने खाजगी दावाखान्यात जावे लागत आहे या रुग्णलयात आरोग्यसेविका चे पद हे दोन वर्षापासून रिक्त आहे,कोरोनाची महामारी आटोक्यात आली असताना बदलत्या वातावरणामुळे सर्वसामान्याचा आरोग्यावर परिणाम झाला आहे केळगाव येथे चिकुनगुनिया आजाराने डोके वर काढले आहे गेल्या काही दिवसापासून सर्दी,खोकला,ताप,अंग दुखणे या आजारामुळे त्रस्त झाले आहे केळगाव परीसरात कोरोनाची साथ आटोक्यात आरोग्य विभागासह प्रशासकीय विभागीय प्रयत्न केले परंत आठ ते दहा दिवसापासून वातावरण होणार्या बदलणार्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परीणाम झाला आहे या आजारामुळे त्रस्त झालेले रुग्ण खाजगी रुग्णलयात उपचार घेत आहे ,मात्र रुग्णलयातील विविध चाचण्यावर खर्च करण्याची वेळ सर्व सामान्य नागरीकांवर आली आहे पाण्याच्या समस्येमुळे ही हे रुग्णाची संख्येत वाढ झाली आहे,