नाशिक येथे भारतीय बौद्ध महासभेचा विभागीय संवाद मेळावा;राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांची उपस्थिती

0

नाशिक : नाशिक येथील आंबेडकर नगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा नाशिक विभागीय संवाद मेळावा व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम नुकताच झाला.कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत राजरत्न आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनिल वैद्य होते.कार्यक्रमाचे आयोजन प्रा.शरद केदारे,देवळा पंचायत समितीचे मा.सभापती तथा आंबेडकरी चळवळीचे सक्रिय नेते राहुल केदारे,प्रा. किशोर मोरे यांनी केले.प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या नाशिक विभागगिय अध्यक्षपदी अशोकराव पटाईत, नाशिक जिल्हाध्यक्ष पदी प्रा.शरद केदारे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी तायडे साहेब,जिल्हा माहिती अधिकारी अनिल गायकवाड,शरद काळे, धर्मभूषण बागुल,रामदास दोंदे,नवीन नन्नावरे,निरंजन नेटावणे, अरुणा मोरे, दीपमाला केदारे,शुभांगी डोंगरे, प्रजासागर भोसले,सागर शिरसाठ आदींसह धम्म बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल केदारे यांनी केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय बौद्ध महासभा भारतातील बौद्ध बांधवांच्या समस्या कशा मांडू शकते याचे महत्त्व राजरत्न आंबेडकर यांनी विशद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here