पोषण अभियानातील पोषण महिना व पोषण पंधरवडा म्हणजे आमच्या नागरी नाशिक-२ प्रकल्पातील आमच्यासह लाभार्थी व पालकांसाठी एक उत्सवच- सुहासिनी कसोटे अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२.

0

नाशिक : सप्टेंबर २०१८ पासून प्रत्येक वर्षी संपूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो..तर प्रत्येक मार्च महिन्यातील ८ ते २२ मार्च हा पोषण पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो..तसा आमचा नागरी नाशिक-२ प्रकल्प हा १०० अंगणवाडी केंद्रांचा व एक महानगरपालिक व तिन नगरपालिका कार्यक्षेत्रात विखुरलेला आहे..आम्ही सप्टेंबर २०१८ पासून यात सातत्यपूर्ण कामकाज करत आहोत..तसेच शासनाने दिलेल्या विविध थिमवर आधारित जनजागृती करत आहोत..खर तर पोषण आभियानाचे माध्यमातून एक जन आंदोलन उभारले जात आहे..याद्वारे पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणे, स्वच्छता, आरोग्य, परसबागा, आहारातील विविधता, खुजेपणा-बुटकेपणा कमी करणे, आॕनिमियाचे प्रमाण कमी करणे, जन्मता कमी वजनाचे बालकांचे प्रमाण कमी करणे, याबाबींचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात आहे..प्रत्येक वेळी विशिष्ट थिमवर आधारीत जनजागृती केली जाते.आम्ही आमच्या प्रकल्पात हा महिना व पंधरावडा उत्सव म्हणून साजरा करतो.शासनाने प्रत्येक वेळी दिलेले नवीन पोस्टर, बॕनर, जिंगल्स, व्हिडिओ याचा प्रभावी वापर आम्ही जनजागृती करतांना करतो…तसेच आम्ही स्वतः व्हिडिओ तयार करुन तसेच नाटिका, एकांकीका, पथनाट्य या माध्यमातून थिमावर आधारित जनजागृती करतो..हे जन आंदोलन असल्यामुळे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे या हेतूने आम्ही आतापर्यंत कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेरही गृहभेटी,मेळावे, पथनाट्य, रॕली या माध्यमातून जनजागृती केलेली आहे..मार्च २०२० पासून कोरोनाचे संकटामुळे आमच्या प्रत्यक्ष क्षेत्रिय स्तरावरील मोठ्या कार्यक्रमांना मर्यादा आल्यात..परंतु म्हणतात ना, कुठलही संकट हे एक चांगली संधीही घेवून येत असत..आम्ही या संधीच सोन केल आहे अस आम्हाला वाटत.मार्च २०२० मधील पोषण पंधरवडा, सप्टेंबर २०२० मधील पोषण महिना, मार्च २०२१ मधील पोषण पंधरवडा व आत्ता सुरु असलेला सप्टेंबर २०२१ मधील पोषण महिना यात आम्ही जास्तीत-जास्त प्रमाणात सोशल मिडियाद्वारे जनजागृती करुन जन आंदोलन जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो आहोत..लाभार्थी सर्वौच्च हिताचे हे काम यापुढेही असेच सातत्यपूर्णपणे सुरु राहील.सही पोषण..देश रोशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here