
नाशिक : 👉पोषण अभियानअंतर्गत २०१८ पासून प्रत्येक सप्टेंबर महिन्यात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जातो आहे..याही वर्षी सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जात आहे..या अभियानात जनजागृती करणेसाठी व जन आंदोलन उभारणेसाठी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी मदतनिस, आशा कार्यकर्ती (AAAA) यांच्या संयुक्त गृहभेटीला फार महत्व आहे..तसेचा पोषण महिन्यातील पहिल्या आठवड्यातच प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह ही साजरा करण्यात येतो..कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे पालकांना बाळाचे पहिले एक हजार दिवस, पौष्टिक आहार, अनीमिया, डायरिया, आरोग्य व स्वच्छता यासोबतच आहारातील विविधता, स्थानिक पालेभाज्या, फळभाज्या,फळे यांचा आहारात जास्तीत-जास्त वापर करण्यासाठी परसबागांचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले जात आहे..गरोदर महिलांनी स्वतः ची काळजी कशी घ्यावी..तसेच स्तनदा मातांनी बाळाची काळजी घेणेबाबत मार्गदर्शन केले जात आहे..कोरोना लसिकरण करुन घेणे बाबतही परिसरातील नागरिकांना या टिमकडून मार्गदर्शन केले जात आहे..नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बाल विकास विभाग व आरोग्य विभाग यांचा योग्य समन्वय असल्याने याबाबी सहज शक्य होत आहेत..कोरोनाचे सर्व नियम पाळून हे कामकाज केले जात आहे..यात सोशल मिडियाचा वापर करुनही काही गृहभेटी दिल्या जात असल्याची माहिती मुख्यसेविका पुष्पा वाघ यांनी दिली….सही पोषण..देश रोशन..
