नागरी नाशिक-२ प्रकल्पात सोशल मिडिया व गृहभेटीद्वारे केली जाते आहे कोरोना लसिकरणाची जनजागृती – शितल गायकवाड मुख्यसेविका,

0

नाशिक – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ मधील नाशिक महानगरपालिका, मनमाड, येवला, भगूर नगरपालिका यांचे कार्यक्षेत्रात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनिस (AAAA) यांचे मार्फत संयुक्त गृहभेटी देऊन कोरोना लसिकरण करुन घेणेबाबत जनजागृती केली जात आहे..यात प्रामुख्याने गर्भवती महिला व स्तनदा मातांना कोविड-१९ लसिकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे.. यात कोरोना हरणार..भारत जिंकणार या टॕग लाईनचा वापरही केला जात आहे..भगूर नगरपालिका कार्यक्षेत्रात तर अनेक दिवसांपासून येथील अंगणवाडीताई व मदतनिसताई या लसिकरणाबाबत आरोग्य विभागास सहकार्य करत आहेत…कोविड-१९ लसिकरणाच्या जनजागृतीसाठी प्रकल्पाने पूर्वीच तयार केलेला जनजागृतीसाठीचा video ही व्हाट्सअपचे माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पाठविला जात असल्याची माहिती प्रकल्पातील मनमाड बिटच्या मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here