कोरोनाचे पार्श्वभूमीवर सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन साजरा केला जातो आहे राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ ( नागरी) नाशिक- २ प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम – रेखा शिंदे अंगणवाडी सेविका अं.केंद्र. क्र. ५६

0

नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ हा नाशिक जिल्ह्यातील शहरी भागातील १०० अंगणवाडी केंद्रांचा प्रकल्प आहे..या प्रकल्पातील नाशिक-५२, मनमाड’-३५, भगूर-०९, येवला-०४ याप्रमाणे नमुद शहरांमध्ये अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत..तस पाहायला गेल तर शहरी भाग म्हटलं कि, अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचा प्रश्न उभा राहतो..परंतु सर्व अडचणींवर मात करुन सप्टेंबर २०१८ पासून या प्रकल्पातील अंगणवाडीताई व मदतनिसताई या पोषण अभियानात सातत्यपूर्ण कामकाज करत आहेत..या ताईंचा महानगरपालिका कार्यक्षेत्र असो कि, नगरपालिका कार्यक्षेत्र असो आरोग्य व शिक्षण विभागाशी उत्तम समन्वय आहे..त्यामुळे कार्क्षेतूरातील कुटुंबांनाषगृहभेट करतांना ब-याच वेळा अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशासेविका, अंगणवाडी मदतनिस (AAAA) ) या सोबतच असतात..याचा फायदा लाभार्थींना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी होतो..भगूर व मनमाड शहरात तर,आरोग्य विभागालाच या ताईंची जास्त मदत होते आहे…या ताईंनी प्रकल्पात पोषण माह सप्टेंबर २०२१ च्या जनजागृतीसाठी योग्य असे आगावू नियोजन केले आहे..पोषण महिना जरी १ सप्टेंबर २०२१ रोजी सुरु झाला असला तरी याची पूर्वतयारी या ताईंनी आॕगस्ट २०२१ मध्येच एक महिना आधीच सुरु केली होती..”पोषणाचे वर्तनात बदल घडविणेसाठी” सप्टेंबर २०१८ पासून साजरा केला जात असलेल्या पोषण अभियानातील विविध थीमचा अभ्यास करुन व अंगणवाडी कार्यक्षेत्रात उपयुक्त ठरु शकणाऱ्या पारंपारिक बाबींचा उपयोग करुन छोटे-छोटे व्हिडिओ या प्रकल्पातील ताईंनी स्वतः अतिरिक्त कामकाज करुन व स्वतः च पात्र व भूमिका साकारुन जनजागृती करणेसाठी तयार केलेले आहेत..हे व्हिडीओ तयार करतांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुळे यांच्या पुढाकाराने प्रकल्पातील १० ताईंची एक टिम बनविण्यात आलेली आहे..या कामी कुठल्याही व्यावसायिक टिमची मदत न घेता अंगणवाडीताई स्वतः च हे सर्व काम स्वेच्छेने करत आहेत..रेखा शिंदे या अंगणवाडीताईने व कविता बर्वे या मदतनिसताईने पुढाकार घेवून सर्व अंगणवाडीताईंना कोरोनाचे पार्श्वभूमीवर सोशल मिडियाद्वारे कशी जनजागृती करायची हे वेळोवेळी झुम मिटींग घेवून समजावून सांगितले आहे..यासाठी त्यांच्या पुढाकाराने प्रकल्पातील याक्षेत्रातील २० जाणकार ताईंची सक्षम टिम तयार करण्यात आली आहे..सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम ही टिम करते आहे..सोशल मिडियातील व्हाट्सअप, युट्युब,ट्विटर,पोर्टल, इ.माध्यमाचा प्रभावी वापर करुन व्हाट्सअप काॕल, व्हिडीओ काॕल, झुम काॕल/मिटींगद्वारे लाभार्थी, पालक व नागरिकांशी संपर्कात राहून जन आंदोलन उभारले जात आहे… कोरोनाचे पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या अंगणवाडी कार्यक्षेत्रातील पालकांच्या सक्रिय असलेल्या व्हाट्सअप गृपचाही जन आंदोलनात जनजागृती करणेसाठी मोठा उपयोग होतो आहे.अडचणींचा कुठलाही बावू न करता सप्टेंबर २०१८ पासून सातत्यपूर्ण कामकाज करत असलेल्या या प्रकल्पातील AAAA&Ls (अंगणवाडीसेविका, आरोग्य सेविका, आशासेविका, अंगणवाडी मदतनिस, मुख्यसेविका) या टिमचा राष्ट्रीय पोषण अभियानातील उत्कृष्ट सांघिक कामगिरीबद्दल दिल्ली येथे पुरस्कार देवून आॕगस्ट २०१९ मध्ये माननीय केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांचेहस्ते गौरव करण्यात आला आहे..या प्रकल्पातील चांगल्या कामाची खरी ताकद म्हणजे आजही ✊🤝एकजूटीने🤝✊ही सर्व टिम कामकाज करते आहे…..रेखा शिंदे या प्रकल्पातील भगूर नगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडीताई सांगतात, लाभार्थीचे सर्वोच्च हितासाठी आमची टिम सदैव तत्पर असते…त्याच कामासाठी आम्हाला मानधन मिळते..आम्ही राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करु..तसेच सोशल मिडीयाचाही प्रभावी वापर करु…आमची टिम या जन आंदोलनात प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण कामकाज करुन खारीचा वाटा उचलत राहील….सही पोषण..देश रोशन..✊🤝🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here