खलबत्ता या सामाजिक लघुपटाचे चित्रिकरण नुकतेच संपन्न..

0

मुंबई : आर्यारवी एंटरटेनमेंट निर्मित, सुप्रसिद्ध लेखक अनंत सुतार लिखित-दिग्दर्शित मराठी लघुपट “खलबत्ता” चे चित्रिकरण नुकतेच पनवेल येथील काळुंद्रे या गावात पार पडले. हल्लीच्या तरुण विवाहीत मुलींना आपला संसार टिकविण्यासाठी सासरी कसे वागायचे असा महत्वपूर्ण संदेश देणारा सामाजिक विषय “खलबत्ता” या लघुपटात लेखकाने ऊत्तमरित्या मांडला आहे. या लघुपटाचे छायाचित्रण महेश्वर तेटांबे यांनी केले असुन रंगभूषा नितीन दांडेकर यांची आहे तर प्रकाशयोजना साहाय्य रामदयाल वर्मा यांनी केले आहे त्याचप्रमाणे पंकज खैरे यांचे विशेष सहकार्य या लघु चित्रपटाला लाभले आहे.या लघुपटात सुप्रसिध्द अभिनेत्री दिपा माळकर हिने मध्यवर्ती आणि महत्वाची भूमिका साकारली असुन सोबत दिपाली मोरे, छाया पालव, प्रियांका, प्रमोद दळवी व विशाल मसकर यांच्याही भूमिका आहेत. लवकरच हा सामाजिक लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे (धन्यवाद,आर्यारवी,एंटरटेनमेंट,)९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here