शेतकऱ्यांना पिक कर्ज व शेती विषयक कर्ज देण्यात बॅंकांकडून टाळाटाळ

0

मनमाड : शेतकऱ्यांना पिक कर्ज व शेती विषयक कर्ज देण्यात बॅंकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी आमदारांकडे आल्यावर मनमाड स्टेट बँकेच्या व्यवस्थापक कुलकर्णी यांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पत्र देऊन सूचना वजा इशारा देण्यात आला. याप्रसंगी शाखा प्रबंधक श्री कुलकर्णी यांना पत्र देऊन याविषयी जि.उपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, गुलाब भाबड यांनी चर्चा केली. चर्चेत मोहेंगाव येथील शेतकरी किशोर हारदे, दत्तात्रय शिंदे, जीवन गंधाक्षे, दिगंबर निकम, दिनेश गायकवाड, राजू मंसुरी, गणेश गंधाक्षे, खंडेराव हरदे, धर्मा मुसनर,बापूराव हरदे, अंबादास गंडाक्षे व इतर शेतकरी बांधवानी त्यांच्या अडचणी व समस्या मांडल्या. शिवसेना शिष्टमंडळासमोर शाखा प्रबंधक यांनी त्या लवकरच सोडविण्याबाबत अश्वसित केले. अन्यथा शिवसेना आंदोलनाचा पवित्रा घेईल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही समंधित अधिकारी यांची राहील असे सूचित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here