जि. प.प्राथमिक शाळा धुळगाव येथे भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिवस कोरोना नियम पाळून मोठया उत्साहात साजरा

0

येवला : येवला तालुक्यातील धुळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी अद्यक्षस्थानी सरपंच श्री.योगेशभाऊ गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी वडितके साहेब ,शशिकांत जगताप , संतोष गायकवाड,विक्रम गायकवाड, दत्तू गायकवाडसह महिला ग्रामपंचायत सदस्य दिपाली गायकवाड, रुक्मिणी सोनवणे,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ध्वजपूजन सदस्य सौ.रुख्मिणिताई बारहाते यांचे हस्ते तर ध्वजारोहन शालेय व्यवस्थापन समिती सद्यस्य श्री.दत्तू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत मार्फत विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे सादर केलीत. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर, सोमनाथ पोद्दार सर, प्रमोद देवडे सर, उगले सर अनिता शिरोळे मॅडम, कुराडे मॅडम , यांच्यासह राजेंद्र गायकवाड सुभाष नाना गायकवाड भाऊसाहेब गायकवाड विठ्ठल वाळके पांडुरंग शेळके दिलीप गायकवाड सुनील शिंदे बाळा बाराते चेतन गायकवाड योगेश सोमवंशी सह गावकरी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here