अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा.

0

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या जनतेला एक आनंदाची पर्वणी म्हणुन राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या नायगाव, दादर येथील कार्यालयात सायंकाळी ६.०० वाजता संपन्न झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या ऑनलाईन स्पर्धेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
१) एकपात्री अभिनय- ३ ते ५ मिनिटांचा आपला विडियो mp4 फाॅरमॅट मध्ये पाठवावा.२) *गीत गायन* (कोणतेही) – ३ ते ५ मिनिटांचा आपला विडियो mp4 फाॅरमॅट मध्ये पाठवावा३) लघुचित्रपट कथालेखन* (३५० ते ४०० शब्द) ४) कविता लेखन वरील सर्व स्पर्धा ह्या सर्व वयोगटातील (खुली) राहणार असून विजेत्या स्पर्धकांना अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्यावतीने आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मान पत्र प्रदान करण्यात येईल शिवाय महामंडळाच्या वतीने आयोजीत होणाऱ्या लघु चित्रपटांत त्यांना सहभागी करण्यात येईल असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी केले आहे तसेच कार्यक्रमामध्ये सर्वतोपरी बदल करण्याचे अधिकार महामंडळाला राहतील असेही सर्वानुमते ठरले. ऑनलाईन प्रवेशासाठी आणि विडियो पाठविण्यासाठी खालील व्हटसप नंबरवर विडियो, लघुचित्रपट कथा आणि कविता *दिनांक १६ सप्टेंबर,२०२१* पुर्वी पाठवाव्यात देवेंद्र मोरे – ९५९४८४८२९० बाळासाहेब गोरे- ८२८६६५३५५७महेश्वर तेटांबे – ९०८२२९३८६७
सुरेश सोनावणे* – ९२२०३७७३१७( धन्यवाद,महेश्वर तेटांबे,चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, पत्रकार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here