श्री मंगेश आढाव यांची कामोठे कॉलनी फोरमच्या अध्यक्षपदी निवड

0

मुंबई – महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधून आणि भारतातील विविध राज्यांमधून नोकरी, काम-धंदा याच्या निमित्ताने नागरिक मुंबई महानगर प्रदेशामध्ये येतात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात. अशाप्रकारे सिडकोने निर्माण केलेल्या सिडको कॉलनीमधील नागरिकांच्या सर्वांगीन उत्कर्षासाठी, तसेच नागरिकांना स्वतःचा प्लॅटफॉर्म देण्यासाठी, खारघर कॉलनी फोरमची स्थापना 2013-14 साली करण्यात आलेली होती. खारघर मध्ये यशस्वी झालेला प्लॅटफॉर्म पाहून कामोठे कॉलनीमधील रहिवाशांनी कामोठे नोड येथेही कॉलनी फोरमची स्थापना करण्याचा आग्रह केला होता. गेले तीन महिन्यापासून, यावर विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच राजकीय कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठका घेण्यात आल्या आणि सर्वानुमते कामोठे कॉलनी फोरमची स्थापना करण्याचे ठरले.आज रोजी कामोठे आणि कळंबोली मधील मुंबईला जाणाऱ्या बस प्रवाशांच्या मागणीवरून, कामोठे कॉलनी फोरमच्या लोकसहभाग मधून तयार करण्यात आलेल्या बसथांबाचे लोकार्पण करण्यात आले.सदर वेळी एकमताने श्री मंगेश अढाव यांची कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष म्हणून कॉलनी फोरमच्या संस्थापिका आणि पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका सौ लीना अर्जुन गरड यांनी निवड केली.श्री मंगेश अढाव आणि शहर कार्यकारणी, कामोठे कॉलनीच्या उद्धारासाठी नक्कीच कार्यरत राहील. आणि कॉलनीमधील नागरिकांना न्याय देईल हीच अपेक्षा.श्री मंगेश अढाव ( 8879288679 ) आणि सर्व कार्यकारिणीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!! कॉलनीमधील सर्व नागरिकांनी, कॉलनीच्या रहिवाशांच्या उत्कर्षासाठी तयार करण्यात आलेल्या , कामोठे कॉलनी फोरम संस्थेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती.( सौ लीना अर्जुन गरड, संस्थापक-अध्यक्ष ,कॉलनी फोरम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here