माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकत आहे, ठाकरेंचीं मुलं कुठं शिकली हे मला सांगू नका” – बच्चू कडू

0

मुंबई – प्रतिनिधी: अवधुत सावंत: कालच मुंबई उच्च न्यायालयाने ११ वी प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द ठरवण्याचा आदेश दिला. यावरून राज्य सरकारला एक दणका हाय कोर्टाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ११ वी ‘सीईटी’च्या मुद्यावर हायकोर्टानं हस्तक्षेप केला. न्यायालयाचा असा निर्णय येईल, असं वाटलं नव्हतं, असे ते म्हणाले.दरम्यान, यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं खासगी शाळेत शिकली याबाबत विचारणा केली असता “त्यांच्या मुलांचे मला सांगू नका, माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.११ वीची ‘सीईटी’ रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही. ११ वीच्या प्रवेशांना कुठेही अडचण येणार नाही, गरज पडल्यास जागांची संख्या वाढवू. तर, एकाही मुलाला प्रवेश मिळला नाही असं होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ११ वीच्या ‘सीईटी’ चे प्रवेश शुल्क भरलं असेल ते त्याला परत मिळेल, तो त्याचा अधिकार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पालकांनी शासकीय शाळांना पालकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here