घाटनांद्रा येथे पहिल्यांदाच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित.

0

सिल्लोड : प्रतिनिधी विनोद हिंगमिरे-जिल्हा परिषद प्रशाला घाटनांद्रा येथे या वर्षी पहिल्यांदाच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यात मराठी, इंग्रजी आणि उर्दू या तिन्ही माध्यमाचे मिळून 78 विद्यार्थी परीक्षेस बसले होते .पैकी 76 जणांनी परीक्षा दिली .ही परीक्षा केंद्र संचालक श्री चौरे आर .पी. ,उपसंचालक श्री वानखेडे एस.जी .यांच्या उपस्थितीत पार पडली. परीक्षेस पर्यवेक्षक म्हणून काटे सर, पानतावणे सर, जयस्वाल सर, वाघमारे सर ,गजभिये सर, साळवे सर, पाटील सर, कादर सर, गरुड सर ,आयुब सर , अन्सारी सरआणि शिपाई शिंदे मामा यांच्या सहकाऱ्यांनी परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. परीक्षा चालू असताना केंद्रास केंद्रप्रमुख श्री व्ही .जी .कुंभारे यांनी भेट दिली व्यवस्थापन कोविंड 19 च्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here