मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणाऱ्या BEST चा ७४ वा बेस्ट दिन नुकताच बेस्ट चैतन्य गीताने साजरा करण्यात आला.

0

मुंबई मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणाऱ्या BEST चा ७४ वा बेस्ट दिन नुकताच बेस्ट चैतन्य गीताने साजरा करण्यात आला.मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी जनतेला अविरतपणे परिवहन सेवा देणारी आणि विद्युत पुरवठा करणाऱ्या बेस्ट’चा ०७ ऑगस्ट २०२१ रोजी ७४ वा बेस्ट दिन होता, दर वर्षी बेस्टचा वर्धापन दिन थाटामाटात सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा होत असतो, परंतु सध्या कोविड १९ च्या महामारीला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे, त्यामुळे जाहीररित्या होणारा बेस्ट दिन, सलग दुसऱ्या वर्षीही होऊ शकला नाही, परंतु बेस्ट दिनाच्या दिवशी काहीतरी कार्यक्रम सादर व्हावा अशी भावना मनात ठेवणाऱ्या बेस्टच्या कलाकारांनी बेस्ट दिनाचे औचित्य साधून, बेस्ट कर्मचारी व अधिकारी यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी “बेस्ट चैतन्य गीताची” निर्मिती केली आहे, हे गीत शुक्रवार दि. ०६ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर साहेब आणि बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र साहेब यांच्या शुभहस्ते ‘यट्यूब’ वर प्रदर्शित करण्यात आले, सदर प्रसंगी बोलताना बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर साहेब यांनी बेस्ट चैतन्य गीत निर्मिती बद्दल कलाकारांचे कौतुक करुन सर्व कामगारांना बेस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या गीताच्या निर्मितीसाठी
संकल्पना व दिग्दर्शक: डॉ.राजेंद्र पाटसुते, गीतकार के. संजय (संजय कामदार) संगीतकार व गायक: सुनील खोबरेकर, ध्वनीमुद्रण व कॅमेरामन: संदीप खराडे,
एडिटर: संजय डिके, नृत्य दिग्दर्शक: अनिकेत खैरे
आणि कलाकार विजय सूर्यवंशी आदी सर्व बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. हे गीत पाहण्यासाठी खालील दिलेली लिंक ओपन करून गाण्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन बेस्ट च्या कलाकारांमार्फत करण्यात आले आहे. https://youtu.be/DqEwe5-n1SI( धन्यवाद,महेश्वर तेटांबे,पत्रकार,९०८२२९३८६७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here